150. विकासाच्या वाटेवरील भारत!

"लोकांचं, लोकांद्वारे आणि लोकांसाठी चालवलं जाणार शासन अथवा सरकार म्हणजे लोकशाही." अशी साधी-सरळ लोकशाहीची व्याख्या केली जाते. या व्याख्येतून लोकशाहीतल 'लोकांचं महत्व' अधोरेखित होत.

लोकशाही शासनाच्या प्रस्थापनेसाठी लोकांचा पुरेसा सहभाग असायला हवा. यामुळेच 'निवडणूक तत्वाचा अन् सार्वत्रिक प्रौढ मताधिकारचा' अवलंब केला जातो. निवडणुकीच्या तत्वावर लोकशाही आधारलेली असल्यानं निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक आणि पारदर्शक असायला हवी.

अलीकडच्या काही काळात देशातील निवडणुकींच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसताय. निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यापासून निवडणुकींच्या निकालापर्यंत सर्वच बाबींवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

निवडणुकींचा खर्च, वेळ इत्यादी वाचावा अन् निवडणुकांतील गैरव्यवहार थांबावे याकरिता 'इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (EVM)' चा स्वीकार भारताने केला. मात्र या EVM यंत्रावरही वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. निवडणुकांच्या निकालानंतर विजयी पक्ष EVM चे फायदे सांगतात अन् पराभूत पक्ष EVM चे तोटे अधोरेखित करतात.

भारतातील निवडणूक प्रक्रिया कायमच वादविवादाच्या कक्षेत आहे. परिणामी निवडणूक प्रक्रियेत आवश्यक असलेल्या सुधारणा तातडीने व्हायलाच हव्या. निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक आणि पारदर्शक असायला हवी. अन्यथा 'मूठभर लोकांचं, मूठभर लोकांद्वारे आणि मूठभर लोकांसाठी चालवलं जाणार शासन म्हणजे मूठभरशाही.' अशीच लोकशाहीची व्याख्या करावी लागेल..!

~ सचिन विलास बोर्डे

35/2

Electoral Reforms | Electoral System | Democracy | Elections | Election Commission of India | ECI | Votes | Voters | Political Reforms | Electoral Transparency | EVM | Universal Adult Franchise 

Comments

Popular Posts

16. विकासाच्या वाटेवरील भारत!

154. विकासाच्या वाटेवरील भारत!

153. विकासाच्या वाटेवरील भारत!