Posts

Showing posts with the label Election Commission of India

150. विकासाच्या वाटेवरील भारत!

" लोकांचं, लोकांद्वारे आणि लोकांसाठी चालवलं जाणार शासन अथवा सरकार म्हणजे लोकशाही. " अशी साधी-सरळ लोकशाहीची व्याख्या केली जाते. या व्याख्येतून लोकशाहीतल ' लोकांचं महत्व ' अधोरेखित होत. लोकशाही शासनाच्या प्रस्थापनेसाठी लोकांचा पुरेसा सहभाग असायला हवा. यामुळेच ' निवडणूक तत्वाचा अन् सार्वत्रिक प्रौढ मताधिकारचा ' अवलंब केला जातो. निवडणुकीच्या तत्वावर लोकशाही आधारलेली असल्यानं निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक आणि पारदर्शक असायला हवी. अलीकडच्या काही काळात देशातील निवडणुकींच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसताय. निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यापासून निवडणुकींच्या निकालापर्यंत सर्वच बाबींवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. निवडणुकींचा खर्च, वेळ इत्यादी वाचावा अन् निवडणुकांतील गैरव्यवहार थांबावे याकरिता ' इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (EVM) ' चा स्वीकार भारताने केला. मात्र या EVM यंत्रावरही वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. निवडणुकांच्या निकालानंतर विजयी पक्ष EVM चे फायदे सांगतात अन् पराभूत पक्ष EVM चे तोटे अधोरेखित करतात. भारतातील निवडण...

77. विकासाच्या वाटेवरील भारत!

कथेची सुरुवात होते 2017 मध्ये. ज्यावेळी ' भाजप ' सरकारने अर्थसंकल्पाद्वारे " निवडणूक रोख्यांची (Electoral Bonds) " योजना कार्यान्वित केली. याद्वारे कोणतीही व्यक्ती, कंपनी, नोंदणीकृत संस्था कितीही रकमेचे निवडणूक रोखे ' स्टेट बँकेच्या ' निर्धारित शाखेतून खरेदी करून हव्या त्या राजकीय पक्षाला सुपूर्द करीत असे. मात्र यातून मतदारांच्या ' माहितीच्या अधिकाराचे ' उल्लंघन होते या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने ही योजना असंवैधानिक ठरवून 2024 मध्ये या अपारदर्शक कथेचा शेवट केला.  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रोख्यांचा तपशील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे. या तपशीलातून अनेक तथ्य आणि सत्य उघडकीस येत आहे. वादग्रस्त कंपन्यांनी कोट्यवधींची रोखे खरेदी केले. आणि राजकीय पक्षांना सुपूर्द केलेत. सत्ताधाऱ्यांद्वारे विविध ' शासकीय तपास यंत्रणेच्या ' साहाय्याने या कंपन्यांना पैसे देण्यास मजबूर केले की काय? हा मोठा प्रश्नच. थोडक्यात, सत्ताधारी पक्षांचे आणि बड्या भांडवलदारांचे / Corporates चे साटेलोटे यातून उघडकीस येण्यास मदत झ...