140. विकासाच्या वाटेवरील भारत!

कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ आणि न्यायमंडळ हे लोकशाहीचे तीन प्रमुख स्तंभ. त्यात चौथ्या स्तंभाचा समावेश अलीकडच्या काही काळापासून केला जातोय.
हा चौथा स्तंभ म्हणजेच "मुक्त अन् स्वतंत्र माध्यमे(Media)."

माध्यमांना 'Print Media' आणि 'Electronic किंवा Broadcasting Media' या दोन प्रकारांत वर्गीकृत करता येतं. प्रिंट मिडियात वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके इत्यादींचा समावेश होतो. तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियात रेडिओ, टेलिव्हिजन वर प्रसारित होणाऱ्या वृत्तवाहिन्या, आणि प्रसारणाच्या इतर माध्यमांचा समावेश होतो.

लोकशाहीच्या तीनही स्तंभावर देखरेख ठेवणं, या तिन्ही स्तंभाचा कार्यकारभार सामान्यांपर्यंत पोहोचवणं, शासन आणि शासितांमध्ये दुवा साधणं, महत्वाच्या सामाजिक मुद्द्यांची चर्चा घडवून आणणं, शासनाच्या जबाबदाऱ्या/उत्तरदायित्व याकडे लक्ष पुरवणं इत्यादी लोकशाहीच्या रुजवणीसाठी आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्या चौथ्या स्तंभाने पार पडायला हव्या.

मात्र हल्ली ही माध्यमे आपल्या जबाबदाऱ्यांपासून भरकटलेली दिसताय. माध्यमांच्या मुक्ततेवर अन् स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जाताय. 2025 च्या 'जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात' (World Press Freedom Index) 180 देशांच्या यादीत भारत 151 व्या स्थानी आहे. म्हणजेच भारतीय मिडिया अजूनही आर्थिक अन् राजकीय दबावातून मुक्त झालेली नाही.

थोड्याबहुत वृत्तवाहिन्यांची 'एकाधिकारशाही' वाढल्याने याच वृत्तवाहिन्या लोकप्रिय बनलेल्या दिसताय. या वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होणारी प्रत्येक बातमी नागरिकांना 'सत्य' वाटायला लागलीय. परिणामी फसव्या, दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या प्रसारणासाठी अन् राजकीय प्रचार-प्रसारासाठी मिडिया सर्वोत्तम माध्यम ठरताना दिसतेय.

या चौथ्या स्तंभाला असेच तडे जाणार असतील तर लोकशाहीच्या इमारतीचे अस्तित्व टिकेल काय? हाच चिंतेचा प्रश्न..!


~ सचिन विलास बोर्डे

33/1

Media | News Channels | Print Media & Electronic Media (Broadcasting Media) | Press Freedom | World Press Freedom Index | Democracy | Monopoly 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!