85. विकासाच्या वाटेवरील भारत!
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (The Indian Council of Medical Research) ने "खाद्यपदार्थांबाबत मार्गदर्शक तत्वे" जारी केले आहेत. या लेखात ही तत्वे तपशीलवार जाणून घेऊयात. तत्पूर्वी ICMR ने अधोरेखित केलेले काही महत्वपूर्ण मुद्दे देखील नमूद करतो.
ICMR - The National Institute of Nutrition च्या मते, देशातील 56.4 टक्के आजारांचं कारण चुकीचा किंवा असमतोल आहार आहे. योग्य आहार आणि व्यायामामुळे Coronary Heart Disease (CHD) आणि Hypertension (HTN) ला लक्षणीय प्रमाणात कमी करता येऊ शकते तसेच Type 2 Diabetes 80% टक्क्यांपर्यंत टाळता येऊ शकतो.
महत्वाची मार्गदर्शक तत्वे -
1. संतुलित आहारासाठी विविध प्रकारचे पदार्थ खावे.
2. गरोदर स्त्रिया आणि नवीन मातांना जास्तीचा आहार आणि आरोग्यसेवा मिळायला हव्या.
3. बाळाला पहिल्या सहा महिन्यांसाठी स्तनपान करा; दोन वर्षांपर्यंत आणि त्यापुढील काळातही स्तनपान चालू ठेवा.
4. सहा महिने वयानंतर, बाळाला घरगुती अर्ध-घन पूरक आहार (Semi-solid Complementary Foods) द्यावा.
5. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा.
6. तेल कमी प्रमाणात वापरा.
7. आहारात चांगली प्रथिने आणि आवश्यक अमीनो ऍसिड असावे. स्नायूंच्या वाढीसाठी प्रोटीन सप्लिमेंट्स टाळा.
8. लठ्ठपणा टाळण्यासाठी योग्य जीवनशैलीचा अवलंब करा.
9. मिठाचे सेवन मर्यादित करा.
10. पुरेशा प्रमाणात पाणी प्या.
11. योग्य आणि स्वच्छ अन्नपदार्थांचे सेवन करा.
अत्यावश्यक पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि लठ्ठपणासारखे असंसर्गजन्य रोग (NCD) टाळण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाचीच ठरतात..!
~ सचिन विलास बोर्डे
20/2
ICMR | NIN | The Dietary Guidelines for Indians (DGIs) | Food | Balanced Diet | Public Health | Health Issues | Non-communicable Diseases (NCDs)
Comments
Post a Comment