79. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकताच 'फुल्यांच्या' जीवन-कार्यावर आधारित "सत्यशोधक" नामक चित्रपट बघितला. पुस्तकातील इतिहास वाचणे अनेकदा डोईजड जाते. हा मानवी गुणधर्मच. मात्र चित्रपटाच्या साहाय्याने हाच इतिहास समजून घेणे सोईचे होते. सत्यशोधक चित्रपट यामुळेच उल्लेखनीय ठरतो.

या चित्रपटात फुले दाम्पत्याच्या महत्त्वपूर्ण संघर्षमय, सुधारणात्मक कार्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रपट पाहताना जणूकाही आपणही त्या काळात वास्तव्य करतोय, फुले दाम्पत्याला प्रत्यक्षात पाहतोय, असा अनुभव येतो. दिग्दर्शक, कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांचे हे कौशल्य देखील उल्लेखनीयच. 

स्वतःला 'आधुनिक (Modern)' म्हणवून घेणारे आपण, द्वेष निर्माण करणारे, हिसंक असलेले, अश्लीलता पसरवणाऱ्या चित्रपटांना अधिकचे प्राधान्य देतो. असे चित्रपट देशभर गाजतात. त्यातुलनेत इतिहासावर आधारित, सत्यावर आधारित, वैज्ञानिकतेवर आधारित चित्रपटांना आवश्यक तेवढी प्रसिध्दी मिळताना दिसत नाही. हे वास्तव आपण लक्षात घ्यायला हवे.

अनेकदा तथ्यावर आधारित चित्रपटांतही मनोरंजनाच्या अथवा इतर हेतूने काही बाबी नव्याने घातल्या जातात किंवा काढून टाकल्या जातात. परिणामी चित्रपटातील तथ्यांची देखील आपण पुन्हा पडताळणी (Cross-Check) करने गरजेचे असते.

सत्यशोधकासारख्या सत्यावर आधारित चित्रपटांची संख्या वाढायला हवी. दर्शकांचाही कल अशा चित्रपटांकडे असायला हवा. कारण असे चित्रपट सुशिक्षितांसह अशिक्षितांनाही तथ्याची-सत्याची-विज्ञानाची जाण करून देतात. अन् "तथ्याची-सत्याची-विज्ञानाची जाण असलेला समाजच आपला विकास साध्य करण्यास सक्षम असतो..!"

~ सचिन विलास बोर्डे

18/5

Movie Review | Satyashodhak Movie (2024) | Mahatma Jyotiba Phule and Savitribai Phule | Satyashodhak Samaj | History 


Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!