165. विकासाच्या वाटेवरील भारत!

'भावना (Emotions) आणि इच्छा (Desires)' या मानवाच्या जडणघडणीत उल्लेखनीय कार्य करतात. इच्छांची पूर्तता मानवाची भावना शमविण्याचे कार्य करते. समजा, "वासना (Lust)" या इच्छेची पूर्तता झाली की मानवाची आनंदाची भावना पूर्ण होते. परिणामी भावनांच्या पूर्ततेसाठी मानव इच्छा पूर्ण करण्यावर जोर देतो. 

'वासना' अथवा 'लैंगिक इच्छा' ज्यास इंग्रजीत 'Lust' अथवा 'Sexual Desire (Libido)' म्हणतात.
ही इच्छा मानव आणि प्राणी या दोन्ही घटकांत दिसून येते. विज्ञानानुसार या इच्छेची उत्पत्ती शरीरातील 'संप्रेरके (Hormones)' यामुळे होते. Testosterone, Estrogen, Dopamine ही काही मूलभूत संप्रेरके यांस कारणीभूत मानले जातात. थोडक्यात वासना ही नैसर्गिकरित्या मानवी शरीरात निर्माण होणारी बाब आहे असे विज्ञान सांगते.

प्राण्यांमध्ये वासनेच्या इच्छेला मर्यादा असल्याचे दिसते. मात्र मानवांमध्ये हीच इच्छा दिवसेंदिवस 'अमर्याद' होतेय.
'आनंद देणाऱ्या गोष्टींचा कायम पाठलाग करणे' हा मानवाचा गुणधर्म आहे. वासना या इच्छेची पूर्तता शारीरिक अन् मानसिक आनंद देणारी असल्याने मानवाने या इच्छेच्या जागृतीसाठी 'कृत्रिम प्रयत्न' सुरू केले आहेत.

मानवांमध्ये वासना ही इच्छा आता नैसर्गिकरीत्या उत्पन्न होत नाही तर ती कृत्रिमरीत्या निर्माण केली जातेय.
यासाठी 'अश्लील साहित्याचा' आधार घेतला जातोय. परिणामी वासना ही केवळ आनंदाची भावना पूर्ण करणारी इच्छा राहिलेली नाही. ही इच्छा आता 'गुन्हेगार' निर्माण करणारी आणि 'मानवी विवेक' नष्ट करणारी ठरतेय...

उर्वरित मुद्द्यांची चर्चा पुढील लेखात करूया..!
 
(क्रमशः)

~ सचिन विलास बोर्डे

38/4

Lust | Sexual Desire | Hormones | Human Psychology | Science | Uncontrolled Desire | Human Development | Awareness | Criminality | Moral Conscience | Morality | Behavioral Science

Comments

Popular Posts

51. विकासाच्या वाटेवरील भारत!

182. विकासाच्या वाटेवरील भारत!

79. विकासाच्या वाटेवरील भारत!