163. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाने "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self Governance Institutions)" निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. येणाऱ्या दोन डिसेंबरला या निवडणुका राज्यात घेतल्या जातील. त्यानुषंगाने सदरील लेख प्रकाशित करीत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीतील अत्यंत महत्वाची पातळी समजली जाते. या संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा लोकशाही प्रक्रियेशी थेट सहसंबंध येतो. परिणामी 'लोकशाहीच्या अन् सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी' स्थानिक स्वराज्य संस्था या महत्वपूर्ण ठरतात.

'ग्रामीण (Rural) आणि शहरी (Urban)' अशा दोन विभागांत स्थानिक स्वराज्य संस्थांची विभागणी केली जाते. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद अशी संरचना बघायला मिळते. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती अशा स्वरूपाची रचना दिसते.

शहराच्या आणि गावाच्या स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा, रस्ते, नाले, सांडपाण्याची व्यवस्था, कचऱ्याचे व्यवस्थापन, आरोग्यविषयक सुविधा, बांधकामांचे नियोजन, केंद्र आणि राज्यांच्या ध्येय-धोरणांची अंमलबजावणी अशा स्वरूपातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक सोय-सुविधांची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहे.

लोकशाही तत्वाच्या रुजवणीसाठी तसेच स्थानिक पातळीवरील समस्यांच्या सोडवणुकीसाठी अन् आपल्या गाव-प्रभागाच्या विकासासाठी या संस्थावर निवडून येणारे 'जनसेवक' जबाबदार अन् उत्तरदायी असायला हवे. यामुळेच मतदारांनी आपल्या प्रतिनिधींना मते देताना 'विवेकबुद्धीचा' अवलंब करायलाच हवा..!

~ सचिन विलास बोर्डे

38/2

Local Bodies Election | Election | Maharashtra | Maharashtra Election | State Election Commission | Local Self Government | Gram Panchayat | Panchayat Samiti | Urban Local Bodies | Rural Local Bodies | Zilla Parishad | Democracy | Municipal Corporations | Municipal Councils | Nagar Panchayats | Grassroot Democracy 

Comments

Popular Posts

51. विकासाच्या वाटेवरील भारत!

182. विकासाच्या वाटेवरील भारत!

79. विकासाच्या वाटेवरील भारत!