153. विकासाच्या वाटेवरील भारत!

"संपत्तीचे विषम वितरण" हे गरिबीचे एक मुख्य कारण मानले जाते. हीच 'आर्थिक विषमता आणि गरिबीचा जन्म' पुढील उदाहरणातून समजून घेता येईल.

समजा, 100 लोकसंख्या असलेल्या 'X' नावाच्या देशात 1000 रुपयांची एकूण संपत्ती आहे. या देशात 10 लोकांचा समावेश असलेल्या 'A' या गटाकडे एकूण संपत्तीपैकी 800 रुपये म्हणजेच 80 टक्के संपत्ती एकवटलेली आहे.
अन् दुसऱ्या बाजूला 90 लोकांचा समावेश असलेल्या 'B' या गटाकडे फक्त 200 रुपये म्हणजेच 20 टक्के संपत्ती शिल्लक उरलेली आहे.

A या गटातील प्रत्येक सदस्याकडे 80 रुपये असतील अन् B या गटातील प्रत्येक सदस्याकडे किमान 2 रुपये असू शकतील. यालाच आर्थिक विषमता अथवा संपत्तीचे विषम वितरण म्हणता येते. X नावाच्या या देशात 10 लोकांच्या A या धनिक गटाला 'दर्जेदार सुख' मिळेल. मात्र बहुसंख्यांचा समावेश असलेल्या B या गटाकडे संपत्तीचा तुटवडा असल्याने या गटाच्या वाटेला 'दर्जेदार दुःख' येईल.
यातूनच गरिबी जन्माला येईल.

आता X या देशातील अर्थव्यवस्थेचा अन् समाजव्यवस्थेचा विकास तिथल्या 'शासनाच्या भूमिकेवर' अवलंबून असेल. शासनाची ध्येय-धोरणे आर्थिक समानता प्रस्थापित करणारे असल्यास X देशाचा निश्चितच आर्थिक आणि सामाजिक विकास गीतिशील होईल. अन् शासनाची ध्येय धोरणे केवळ A गटांच्याच हिताचे असल्यास X या देशाचा आर्थिक विकास होईल मात्र सामाजिक विकासात गतिशीलता नसेल..!

~ सचिन विलास बोर्डे

35/5

Economic Inequality | Poverty | Inequality | Economics | Society | Development 

NEXT 🔹 PREVIOUS

Comments

Popular Posts

15. विकासाच्या वाटेवरील भारत!

17. विकासाच्या वाटेवरील भारत!

152. विकासाच्या वाटेवरील भारत!