53. विकासाच्या वाटेवरील भारत!

नमस्कार वाचकांनो..!

"जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे।
शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।"

यातूनच प्रेरणा घेत वर्षभरापूर्वी म्हणजेच दिनांक
'02 OCTOBER 2022' रोजी "विकासाच्या वाटेवरील भारत!" या संकल्पनेचा प्रारंभ केला होता. आज या संकल्पनेला एक वर्ष पूर्ण होत आहे.

विविध संवैधानिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, वैज्ञानिक ई. विषयांवर मी अगदी मोजक्या शब्दांत लेखन सादर करीत आलोय. आपणही चार ते पाच मिनिटे वेळ वाचनासाठी देताय ही बाब मला प्रेरणा देणारी ठरते.

'प्रकाशित केलेले लेख कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूने झुकलेले अथवा विरोधी भूमिका घेणारे मुळीच नाही. शासनाचे अनेक ध्येय-धोरणे उल्लेखनीय असतात तर काही धोरणे गफलतीची असू शकतात. तीच बाब समाजाला देखील लागू होते. समाजातही अनेक योग्य-अयोग्य बाबींचे मिश्रण असते. योग्य बाबींना/धोरणांना संमती देणे आणि अयोग्य बाबींवर/धोरणांवर टीका करणे, हीच भूमिका मी घेतलीय.'

प्रकाशित लेखांबद्दल - 
एका वर्षाच्या काळात सातत्याने प्रत्येक रविवार मी लेख प्रकाशित केलेत. या लेखाला गृहीत धरल्यास एकूण 53 लेख प्रकाशित झालेत. एकत्रितपणे जवळजवळ 8400 शब्दांचे (मराठी) लिखाण मी पार पाडलेय. विविध भाषेत लेख प्रकाशित व्हावे तसेच अधिक माहिती देता यावी याकरिता अलीकडेच वेबसाईट देखील निर्माण केलीय.

"जनजागृतीचा हाती घेतलेला हा गाडा असाच सतत चालू असेल, याची तुम्हांस या लेखणीतून खात्री देत आहे."
तुम्हीदेखील या लेखांना डोळ्याआड न करता तुमचे 'चार-पाच मिनिटे' मला द्याल आणि शक्य झाल्यास हे लेख इतरांपर्यंत पोहोचवाल हीच अपेक्षा.

धन्यवाद..!

~ सचिन विलास बोर्डे

13/1

विकासाच्या वाटेवरील भारत! | Completed One Year | Awareness 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!