25. विकासाच्या वाटेवरील भारत!
मागील लेखामध्ये कलम '19 C' पर्यंतचे विवेचन नमूद करण्यात आले आहे. लेख 'क्र. 6/2' चे उर्वरित विश्लेषण पूर्ण करीत आहे.
कलम 19 D. भारतभर मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य. (To move freely throughout the territory of India.)
कोणताही भारतीय नागरिक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका राज्याच्या विविध ठिकाणी मुक्तपणे संचार करू शकतो.
'मर्यादा' - सर्वसाधारण लोकांच्या किंवा अनुसूचित जमातींच्या हितरक्षणासाठी संचार स्वातंत्र्यावर निर्बंध घालता येतात.
E. भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा हक्क. (To reside and settle in any part of the territory of India.)
भारतातील प्रत्येक नागरिकास भारतात कोणत्याही ठिकाणी वास्तव्य करणे आणि स्थायिक होण्याचा हक्क यात अंतर्भूत आहे.
'मर्यादा' - सामान्य लोकहित आणि अनुसुचित जमातीचे हितसंबंध या आधारे निर्बंध लादता येतात.
F. संपत्ती ग्रहण करणे व तिचा विनियोग करणे.
सर्व नागरिकास संपत्ती बाळगण्याचा आणि विनियोग करण्याचा हक्क प्रदान करण्यात आला होता. तथापि, 1978 ची 44 वी घटना दुरुस्तीव्दारे या हक्कास वगळण्यात आले. 'कलम 300 A ' अंतर्गत त्याला कायदेशीर हक्क म्हणून नमूद करण्यात आले आहे.
G. कोणताही पेशा आचारण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क. (To practise any profession, or to carry on any occupation, trade or business.)
'मर्यादा' - सार्वजनिक हिताच्या दृष्टीने बंधने घालता येतात. राज्याला व्यवसाय-उद्योगावर व्यावसायिक अथवा तांत्रिक पात्रतेची अट घालता येईल. राज्याला स्वयं एखादा व्यवसाय-उद्योग हाती घेता येईल. तसेच व्यवसायावर पूर्ण प्रतिबंध अथवा त्यांचे नियंत्रण करू शकते.
मानवाच्या आत्मविकासासाठी, राहणीमान उंचावण्यासाठी, प्रतिष्ठेचे जीवन मिळविण्यासाठी ही व्यापक स्वातंत्र्य महत्वाची ठरतात..!
~ सचिन विलास बोर्डे
6/3
Article 19D | Article 19E | Article 19F | Article 19G
Comments
Post a Comment