Posts

Showing posts matching the search for Pollution

162. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 37/4 मध्ये आपण वायू प्रदूषणाबाबत माहिती घेतली. आजच्या लेखातून " जल प्रदूषण (Water Pollution) " समजून घेऊयात... सुमारे चार अब्ज (4 Billion) वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवर सजीवांची निर्मिती झाली. पाण्यात रासायनिक अभिक्रिया होऊन पाण्यातूनच सजीव उत्पत्तीस आले. पुढे विविध टप्प्यांतून उत्क्रांत होऊन या सजीवांनी आजवरचा विकास गाठला. थोडक्यात, पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या ' उत्पत्तीसाठी ' पाणी हा घटक अत्यंत महत्वाचा ठरला. 29% जमीन अन् 71% पाणी अशी पृथ्वीची रचना. या 71 टक्के पाण्यापैकी केवळ 3 टक्के पाणी मानवाच्या उपयोगाचे आहे. उर्वरित 97% पाणी हे खारे असल्याने मानवी उपयोगात येत नाही. या 3 टक्के पाण्यापैकी 69% भाग बर्फ, हिमनद्यांनी, 30% भाग भुजलाने आणि केवळ 1% भाग तलाव, नद्यांनी व्यापलेला आहे. हेच 1% पाणी वापरण्याजोगे असल्याने या 1% पाण्यातूनच पृथ्वीवरील मानव प्रजातीला आपली पाण्याची गरज भागवावी लागते. या 1% पाण्यातही बाह्य पदार्थ, विषारी घटक मिसळल्याने हे पाणी प्रदुषित होते. गावांतून, शहरांतून, औद्योगिक कारखान्यांतून येणारे सांडपाणी; कचरा, प्लास्टिक; शेतीतील खते, कीटकन...

161. विकासाच्या वाटेवरील भारत!

शालेय अभ्यासक्रमात विज्ञानाच्या पुस्तकात ' प्रदूषण ' हा घटक अंतर्भूत केलेला असतो. या घटकांतर्गत प्रदूषणाचे विविध प्रकार शाळेत शिकविले जातात. प्रदूषणाच्या विविध प्रकारांपैकी " वायू प्रदूषण (Air Pollution) " हा एक महत्वाचा प्रकार मानला जातो. याच वायू प्रदूषणाची उजळणी (Revision) आजच्या लेखातून करूया... वायू (Gases), जलबाष्प (Water Vapor) आणि धूलिकणांच्या (Dust Particles) मिश्रणातून पृथ्वीच्या वातावरणाची निर्मिती होते. या वातावरणात 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आणि 1% आरगॉन, कार्बन डायऑक्साइड, मिथेन इत्यादी वायू समाविष्ट असतात. वाहनांतून आणि औद्योगिक कारखान्यांतून तसेच कोळसा, लाकूड, कचरा अन् फटाक्यांच्या ज्वलनातून निघणाऱ्या धुराने आणि जंगलतोड वाढल्याने Carbon Monoxide (CO), Sulfur Dioxide (SO2), Nitrogen Oxides आणि Particulate Matter (PM 2.5) सारख्या सूक्ष्म कणांचे प्रमाण वातावरणात वाढत जाते. याचा एकंदरित दुष्परिणाम पृथ्वीवरील सजीव जीवसृष्टीवर आणि पर्यावरणावर होतो. बहुतांश देश वायू प्रदूषणास जबाबदार आहेत. परिणामी या सर्व देशांनी मिळून या समस्येकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहेच. भ...

39. विकासाच्या वाटेवरील भारत!

जगभरात सतत पर्यावरणीय बदल पहावयास मिळत आहे. हेच बदल नैसर्गिक आपत्तीचे रूप धारण करीत आहे. जसे उष्णतेच्या लाटा (Heat Wave), चक्रीवादळे (Cyclones), ज्वालामुखीय उद्रेक, भूकंप, त्सुनामी, भूस्खलन (Landslide), मोठ-मोठ्या जंगलांना आगी लागणे (Forest Fire), दुष्काळ, इत्यादी... या आपत्ती नैसर्गिक जरी जाणवल्या तरी कुठे ना कुठे मानवाचे योगदान यामध्ये आहे. अगदी 'आदिम काळापासून' मानव निसर्गाचा उपभोग घेत आलायं... त्याकाळी मर्यादित गरजा अन् अमर्याद साधने होती. आत्ताच्या 'उत्तर-आधुनिक' जगाचा विचार केला तर मानवाच्या गरजा वाढल्या आणि संसाधने अपुरी पडली. यातून सुटका करण्यासाठी मानवाने विविध यंत्र-तंत्रांचा शोध लावला. हीच यंत्रे आज पर्यावरणाची राखरांगोळी करायला निघाली. यातील काही परिचित यंत्रांचा आपण रोज उपयोग करतो. जसे वाहने, घरातील AC, Refrigerator इत्यादी. यातून अनेक असदृष्य वायू बाहेर पडतात. जे वायुप्रदूषण म्हणून ओळखले जाते. हा एक आयाम. अशाच प्रकारे मानव विविध प्रकारचे प्रदूषण करतोय.  प्रश्न उपस्थित होतो, येणाऱ्या पिढीसाठी संसाधने उरतील काय..? विविध देशांनी आणि भारताने निर्मिलेल्या ...

48. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारताने लोकसंख्येत पहिला क्रमांक मिळविला हे ठाऊकच आहे. जसजशी लोकसंख्या वाढते तशी रोजच्या वापरातील वस्तूंची मागणी वाढते. अन् बहुतांश वस्तू प्लास्टिकच्या वेष्टनात विकल्या जातात. प्लास्टिक म्हणजे 20व्या शतकातील अद्भुत शोधच... मानवी जीवनच प्लास्टिक ने वेढलयं. केसाच्या कंगव्यापासून पायातल्या चपली-बुटा पर्यंत हे प्लास्टिक मानवी जीवनाशी सलंग्नित झालंय. त्याचा उपभोग घेऊन झाला की ते प्लास्टिक आपण हव्या त्या ठिकाणी मनसोक्तपणे फेकून देतो किंवा जाळून टाकतो. 'पुढे त्याच काय होत असेल बरं?' याची आपल्याला कल्पनाच नसते. फेकलेल्या प्लॅस्टिकची दाहकता निदर्शनास आणण्यासाठी आजच्या लेखाची जुळवाजुळव करीत आहे.  प्लास्टिकचे विघटन व्हायला कित्येक वर्ष लागतात. हवेद्वारे, पाण्याद्वारे ते नाले-ओढे-तलाव-नदी-समुद्राला येऊन मिळते. पाण्यात रासायनिक प्रक्रिया होऊन पाण्यातील सजीवांना तसेच मानवाला हानी पोहचविते. हीच प्रक्रिया जमिनीत देखील घडते. जमिनीची सुपीकता कमी करण्यात प्लॅस्टिकची मोठी भूमिका असते. प्लास्टिक जाळल्यास 'Carbon Dioxide, Sulfur Dioxide, Carbon Monoxide, Dioxins' अशी कितीतरी रसायने/वायू हवे...

119. विकासाच्या वाटेवरील भारत!

नोव्हेंबर 2024 मध्ये UNICEF या आंतरराष्ट्रीय संस्थेचा " The State of the World's Children 2024 " नामक अहवाल प्रकाशित झाला होता. या अहवालाने अधोरेखित केलेल्या काही ठळक बाबी आपण समजून घेऊया. अहवालानुसार -  2050 या वर्षापर्यंत भारतात लहान मुलांची संख्या 35 कोटी असेल. इतर देशांच्या तुलनेत जागतिक पातळीवर भारताचा मुलांच्या लोकसंख्येतील वाटा 15 टक्के असेल. यामुळेच भारताला लहान मुलांच्या रक्षणाची मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल.  पर्यावरण आणि हवामान बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर, शिक्षणावर आणि अन्न-पाण्यासारख्या जीवनावश्यक स्त्रोतांवर होतो. 2050 पर्यंत लहान मुलांना तीव्र हवामान आणि विविध पर्यावरणीय संकटाना सामोरे जावे लागेल तसेच 2000 च्या तुलनेत जवळपास आठ पट जास्त मुले अतिउष्णतेच्या लाटेला सामोरे जातील असेही हा अहवाल नमूद करतो. आफ्रिकेसारख्या कमी संसाधने अन् कमी उत्पन्न असलेल्या देशांत पर्यावरणीय संकटाची तीव्रता अधिक असते. अशा देशात सर्वाधिक मुलांची संख्या असेल. यामुळेच अशा देशांना तातडीने उपाय-योजना आखाव्या लागतील. Children’s Climate Risk Index (CCRI) 2021 मध्ये भारत 163 देशांमध्...