156. विकासाच्या वाटेवरील भारत!

16 सप्टेंबर हा दिवस 'जागतिक ओझोन दिन (World Ozone Day)' या अर्थाने लक्षात ठेवला जातो. यानुषंगाने पृथ्वीच्या अस्तित्वासाठी "ओझोनचं महत्व" आजच्या लेखातून समजून घेऊया.

ओझोनचा अर्थ अन् महत्व -
ऑक्सिजनचे तीन अणू मिळून ओझोनचा एक रेणू तयार करतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 15 ते 50 किलोमीटर वर आढळणाऱ्या स्थितांबर (Stratosphere) या थरात पृथ्वीच्या अवतीभोवती ओझोनचे आवरण आढळते. त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू, अंधत्व तसेच पिकांना आणि सागरी जीवसृष्टीला नुकसानकारक असणारे 'Ultraviolet (UV), UV-B' ही किरणे ओझोनोमुळे शोषली जातात. थोडक्यात, हानिकारक अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण ओझोनच्या थरामुळे शक्य होते.

ओझोनचा ऱ्हास -
मानवी प्रगतीसाठी पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचे मनसोक्त शोषण करण्याचा गुणधर्म मानवाने आजपर्यंत जपलेला आहे. याच गुणधर्मातून Chlorofluorocarbons (CFCs), Halons, Carbon Tetrachloride, Methyl Chloroform, Methyl Bromide, Hydrobromofluorocarbons (HBFCs) इत्यादी मानवनिर्मित रसायनांच्या साह्याने मानवाने यंत्रे-तंत्रे अन् विविध वस्तू बनविल्या. आता हीच रसायने ओझोनच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरताय. ओझोनमध्ये 1% घट झाल्यास हानिकारक अतिनील किरणे 2% ने वाढतात, ज्यामुळे दरवर्षी 20 लाख नवीन मोतीबिंदूचे रुग्ण निर्माण होण्याची शक्यता असते.

ओझोनच्या ऱ्हासावर उपाययोजना -
जागतिक पातळीवरील 1985 चे Vienna Convention, 1987 चा Montreal Protocol आणि 2016 चे Kigali Amendment या अत्यंत महत्वाच्या बैठका आहेत. या बैठकांदरम्यान निश्चित केलेले ध्येय-धोरणांच्या पूर्ततेवर राष्ट्रांनी भर द्यायला हवा. Ozone Depleting Substances (ODS) (Regulation and Control) Rules 2000, ODS Phase-Out, HCFC Phase-Out, India Cooling Action Plan (ICAP) इत्यादी धोरणांच्या माध्यमातून भारताने केलेली कामगिरी देखील उल्लेखनीय आहे..!

~ सचिन विलास बोर्डे

36/3

World Ozone Day | Ozone | Ozone Layer | Ozone Depletion | Environmental Policy | Environment | Climate Change | Sustainable Development | Health | Ecosystem | Environmental Diplomacy | International Treaties | Atmospheric Science

NEXT 🔹 PREVIOUS

Comments

Popular Posts

155. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!