122. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारताला ब्रिटिशांच्या वर्चस्वातून मुक्त करण्याकरिता भारतीय राष्ट्रीय चळवळ उभी केली गेली. पुढे याच चळवळीतून 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस' ची स्थापना झाली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या विविध योजना काँग्रेसने विविध अधिवेशनात मांडल्या.

डिसेंबर 1929 मध्ये 'लाहोर अधिवेशन' भरवले गेले. या अधिवेशनात 26 जानेवारी 1930 ला 'पूर्ण स्वराज्याचा' ठराव पारित केला गेला. आणि पूर्ण स्वराज्याची मागणी केली गेली.
(पूर्ण स्वराज्य म्हणजे ब्रिटिश राजवटीपासून पूर्णपणे स्वातंत्र्य.)

थोडक्यात 26 जानेवारी 1930 या तारखेला काँग्रेसने स्वातंत्र्य दिन घोषित केला. याच दिवसाचे महत्व अधोरेखित करत 26 जानेवारी 1950 हा दिवस "प्रजासत्ताक दिन" म्हणून स्वीकार करण्यात आला.

26 नोव्हेंबर 1949 पासून केवळ नागरिकत्व, निवडणुका, संसद अशा तात्पुरत्या स्वरुपातील तरतुदींची अंमलबजावणी सुरू झाली. राज्यघटनेतील उर्वरित सर्व तरतुदींची आणि प्रजेच्या हाती सत्ता देणाऱ्या अन् लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या संविधानाची खरी अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. यामुळेच या दिनाला प्रजासत्ताक दिन म्हणून ओळख मिळाली.

संविधानाने भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या तत्वांची ओळख करून दिली.
संविधानाने नागरिकांना सामाजिक, आर्थिक अन् राजकीय न्याय; विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व उपासना, समानता, बंधुता ही तत्वे असणारे हक्क-अधिकार-कर्तव्यांची जाण करून दिली. अशा या बहुमोल राज्यघटनेचा प्रत्येक भारतीय आदर करेल याच अपेक्षेने सदरील लेखनास पूर्णविराम देतो.

जय संविधान, जय भारत..!

~ सचिन विलास बोर्डे

28/4

Republic Day | History of the Indian Constitution | Historical Background | Constituent Assembly | Making of the Indian Constitution | Structure of the Indian Constitution | Drafting Committee | Indian National Congress - INC | Lahore Session | Complete Independence | Polity | History 

Comments

Popular Posts

51. विकासाच्या वाटेवरील भारत!

182. विकासाच्या वाटेवरील भारत!

79. विकासाच्या वाटेवरील भारत!