2. विकासाच्या वाटेवरील भारत!
अविवाहित स्त्रियांना देखील गर्भपाताचा अधिकार देणे म्हणजे उच्च न्यायालयाने केलेली नुकतीच उल्लेखनीय कामगिरीच.!
स्त्रीला तिच्यावर लादली जाणारी गर्भधारणा, लादले जाणारे मातृत्व नाकरण्याचा कायदेशीर हक्क आहे याच पार्श्वभूमीवर गर्भपात कायदा कलम 3 (ब) ची कक्षा अधिक व्यापक बनविणारा हा निकाल...
एखादी स्त्री अविवाहित आहे म्हणून 20 आठवड्याच्या पुढे गर्भपात करू शकत नाही आणि एखादी स्त्री विवाहित आहे म्हणून ती 24 व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करू शकते, हा मुद्दाच न्यायालयाने तर्कविसंगत ठरविला.
नवऱ्याकडून होणाऱ्या सक्तीच्या लैंगिक संबंधांना देखील याच निकालामधून बलात्काराच्या कक्षेत आणून न्यायालयाने समस्त भारतीय स्त्रियांना खरोखरच दिलासा दिला आहे.
विवाहित अथवा अविवाहित ही तफावत नष्ट करत सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खरोखरच बुद्धिनिष्ठ आणि प्रागतिक विचारसरणीचे प्रतीक ठरतो.
~ सचिन विलास बोर्डे
1/2
MTPAct | Supreme Court | Women Empowerment
Comments
Post a Comment