Posts

Showing posts with the label India Census

184. विकासाच्या वाटेवरील भारत!

2011 नंतर तब्बल पंधरा वर्षांनी देशाची " जनगणना-2027 (Census-2027) " 1 एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतरची ही जनगणना आठवी आणि एकूण मालिकेतील सोळावी असेल. डिजिटल पद्धतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होणारी ही पहिलीच जनगणना असेल. जनगणना-2027 ' दोन टप्प्यांत ' पार पाडली जाणार आहे. ' पहिला टप्पा ' 01 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या दरम्यान पार पाडला जाणार आहे. या पहिल्या टप्प्यात, 'घरयादी व गृहगणना (House Listing and Housing Census - HLO) ' होईल. या टप्प्यात घरांची स्थिती, घरातील सोय-सुविधा, कुटुंबाविषयक माहिती या स्वरूपातल्या 33 प्रश्नांतून माहिती संकलित केली जाईल. ' दुसरा टप्पा ' फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होईल. या दुसऱ्या टप्प्यात ' लोकसंख्येची गणना (Population Enumeration) ' करण्यात येईल. या टप्प्यात लोकसंख्या, सामाजिक-आर्थिक बाबी, शिक्षण, स्थलांतर, प्रजननक्षमता इत्यादी माहिती संकलित केली जाईल. जातीनिहाय माहिती याच टप्प्यात नोंदविली जाईल. या दोन्ही टप्प्यांत जनगणना अधिकारी (Enumerators) द्वारे होणाऱ्...