Posts

Showing posts with the label Ideology

160. विकासाच्या वाटेवरील भारत!

" नक्षलवाद " ही भारताच्या अंतर्गत सुरक्षेला मोठे आव्हान असल्याचं आपण बऱ्याचदा ऐकतो. आणि अलीकडेच एका मोठ्या नक्षली नेत्याने त्याच्या सहकाऱ्यांसमवेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शरणागती पत्करल्याने नक्षलवादाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. छत्तीसगढ, झारखंड, ओरिसा, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील आदिवासीबहुल अविकसित डोंगराळ प्रदेशात नक्षलवादी चळवळी कार्यरत असलेल्या दिसतात. या भागाला ' रेड कॉरिडॉर ' या नावे ओळखले जाते. या चळवळी सशस्त्र उठाव अन् हिंसेच्या माध्यमांतून केंद्र अथवा राज्यांच्या शासनाकडे आपल्या मागण्या मांडतात. यासाठी सामान्य नागरिकांची या चळवळीत भरती केली जाते. नक्षलवादाच्या प्रश्नाची सोडवणूक ' बंदुकीने किंवा विचाराने ' अशा दोन पर्यायांनी करता येऊ शकते. बंदुकी हाती असलेले नक्षलवादी सुरक्षा यंत्रणेला ओळखता येतील. सुरक्षा यंत्रणा त्यांच्यावर गोळ्या झाडतीलही, मात्र ज्यांच्या हाती शस्त्रे नाहीत अशांना ओळखणे कठीण आहे. यामुळेच विचारांचा दुसरा पर्याय अवलंबणे गरजेचे ठरते. नक्षलवाद ही बंदुकीच्या गोळीने सं...

133. विकासाच्या वाटेवरील भारत!

आजच्या लेखात मनुष्याचे " वैचारिक जग आणि वास्तवातील जग " यांच्या सहसंबंधांची चर्चा करूया. खरेतर याच दोन्ही जगांमध्ये मनुष्याच्या सुख-दुःखाची मुळे शोधता येतात. मनुष्याकडे विवेक आहे आणि तो विचार करतो यामुळे मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा गणला गेला. याच गुणांमुळे मनुष्याने आजवरची प्रगती साध्य केली. वैचारिक लिखाणातून वास्तवातील जगावर चर्चा केली गेली. अन् यातून चिद्वाद/आदर्शवाद (Idealism), वास्तववाद (Realism), भौतिकवाद (Materialism) अशा तत्त्वज्ञानाच्या शाखा विकसित झाल्या. या दुनियेचं अन् या दुनियेतील संकल्पनांच आहे तसंच वर्णन वास्तववाद आणि भौतिकवाद करतो. हा वास्तववादी आणि भौतिकवादी विचार ' काय आहे ' या वास्तविक प्रश्नावर अधिकचा भर देतो. याउलट आदर्शवादाचा ' काय असायला पाहिजे ' या वैचारिक प्रश्नावर भर असतो. काय आहे आणि काय असायला हवं या मूलभूत प्रश्नांतूनच या विचारांचा उगम झाला. हेच विश्लेषण आपण आता एका उदाहरणातून समजून घेऊया. समजा सर्वांच्या परिचयाची ' प्रेम ' ही भावनिक संकल्पना घेतली, तर वैचारिक जगात प्रेम ही भावना मनाला आनंदी करणारी वाटते, मानसिक सुख देण...