Posts

Showing posts with the label Union Health Ministry

91. विकासाच्या वाटेवरील भारत!

" धूम्रपान " आरोग्यास हितकारक नाही... ही बाब सर्वांनाच ठाऊक आहे. तरीदेखील भारतात धूम्रपानाचे प्रमाण अधिक आहे हे दर्शविणारा ' इंडिया टोबॅको कंट्रोल रिपोर्ट/अहवाल ' केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रकाशित केला होता. अहवालानुसार, ' किशोरावस्थेतल्या (Adolescents) मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अत्याधिक आहे. ' 2009 ते 2019 या काळात मुलींमधल्या धूम्रपानाच्या प्रमाणात 3.8 टक्क्यांची वाढ होऊन हे प्रमाण 6.2 टक्क्यांवर पोहोचले. मुलांमधील धूम्रपानाच्या प्रमाणात 2.3 टक्क्यांची वाढ झाली. प्रौढ पुरुषांच्या धूम्रपानाच्या प्रमाणात 2.2 टक्क्यांची आणि स्त्रियांच्या प्रमाणात 0.4 टक्क्यांची घट झालीय. धूम्रपानाच्या जीवघेण्या व्यसनात तरुण पिढी (प्रामुख्याने तरुण मुली) अडकल्याचे वास्तव या अहवालातून अधोरेखित होते. किशोरावस्थेतील तरुण-तरुणी ' कूल अन् फॅशनेबल ' दिसण्याकरिता, ' टेन्शन ' पासून मुक्ती मिळविण्याकरिता तसेच इतरांच्या प्रभावाखाली येवून धूम्रपान करतात. मुलीने किंवा प्रौढ स्त्रीने धूम्रपान करणे म्हणजेच ' स्त्री सक्षमीकरणाचं ' प्रतीक असल्याचं चित्र निर्माण के...