Posts

Showing posts with the label Patriarchy

180. विकासाच्या वाटेवरील भारत!

जागतिक महिला दिनाविषयक लेख क्र. 30/2 काही बदलांसह पुनः प्रकाशित करीत आहे. 8 मार्चला जगभर " जागतिक महिला दिन " साजरा केला जातो. जगभरातील महिलांना या दिनी भरपूर महत्व अन् विशेष वागणूक दिली जाते. सर्वच समाज माध्यमांवर शुभेच्छावर्षाव केला जातो. मात्र इतक्याच बाबी पार पाडून महिलांचा विकास आणि महिलांचं सक्षमीकरण होणारं नाही. भारतीय समाजात इतिहास काळापासूनच महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या व्यवस्थेने महिलांना ' मूलभूत हक्क नसलेली शोषक समाजरचना ' निर्माण केली. या व्यवस्थेने पुरुषांना श्रेष्ठत्व प्रदान केलं. ज्यातून ' पुरुषसत्ताक व्यवस्था ' जन्माला आली. या शोषक व्यवस्थेत स्त्रियांना पुरुषांची लालसा भागविणारी गुलाम अन् मुलांना जन्माला घालणारे एक यंत्र अथवा साधन मानले जाऊ लागले. नंतरच्या काळात अनेकांच्या प्रयत्नाने स्त्री-पुरूष समान असलेल्या अन् स्त्रियांना प्रतिनिधित्व देणाऱ्या व्यवस्थेची गरज अधोरेखित झाली. अन् याच गरजांची पूर्तता ' संविधानाच्या चौकटीत ' स्त्रियांविषयक तरतुदींचा स्वीकार करून केली गेली. आज बोटावर मोजता येतील इतक्या महिलांनी भली-मोठी प्रगती केली य...

128. विकासाच्या वाटेवरील भारत!

8 मार्चला जगभर " जागतिक महिला दिन " साजरा केला जातो. जगभरातील महिलांना या एकाच दिनी भरपूर महत्व अन् विशेष वागणूक दिली जाते. सर्वच समाज माध्यमांवर शुभेच्छावर्षाव केला जातो. मात्र इतक्याच बाबी पार पाडून महिलांचा विकास आणि महिलांचं सक्षमीकरण शक्य होईल का? हा प्रश्न उरतोच... इतिहास काळापासूनच महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या व्यवस्थेने महिलांना ' मूलभूत हक्क नसलेली शोषक समाजरचना ' निर्माण केली. या व्यवस्थेने पुरुषांना श्रेष्ठत्व प्रदान केले. ज्यातून ' पुरुषसत्ताक व्यवस्थेने ' डोके वर काढले. स्त्रियांना पुरुषांची लालसा भागविणारी गुलाम अन् मुलांना जन्माला घालणारे एक यंत्र अथवा साधन मानले जाऊ लागले. नंतरच्या काळात अनेकांच्या प्रयत्नाने स्त्री-पुरूष समान असलेली व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला गेला. संविधानाच्या चौकटीत ही समतेची व्यवस्था साकारली गेली. आज बोटावर मोजता येतील इतक्या महिलांनी भली-मोठी प्रगती केली यावरून भारतातील सगळ्याच महिला प्रगत झाल्या असा निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. आजही स्त्रियांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. विविध रूपातून या समस्या समोर येत आहेत. म...

100. विकासाच्या वाटेवरील भारत!

बलात्कार आणि हत्या प्रकरणे का वाढेलत आणि या प्रकरणांची कारवाई करण्यात विलंब का होतोय या दोन प्रश्नांचे विश्लेषण आपण मागील लेखात बघितले. आजच्या लेखात उर्वरित दोन प्रश्नांचे विश्लेषण करूया... 1. बलात्काराची प्रकरणे कशी थांबवता येतील? भारतामध्ये स्त्रियांवरील अत्याचाराची समस्या ही काही नवी नाही. इतिहासकाळापासून " पितृसत्ताक/पितृप्रधान/Patriarchy " व्यवस्थेने पुरुषी वर्चस्व कायम राखण्याकरिता स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं. यातून 'स्त्रियांना पुरुषी लालसा भागविणारी गुलाम, आणि मुलांना जन्म देणारे केवळ एक साधन' मानले जाणारा विचार समोर आला. अन् हाच विचार आजही या समाजात टिकून आहे हे खैरलांजी, निर्भया, हैदराबाद, उज्जैन, मणिपूर, कोलकता अशा कित्येक प्रकरणांतून लक्षात येत. लगेचच कठोर कायदे करून लगेचच हा समाज बदलणार नाही. जोवर हा वर्चस्ववादी विचार अन् ही वर्चस्ववादी मानसिकता बदलणार नाही तोवर स्त्रियांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती थांबणार नाही. 2. यावर उपाय-योजना काय? उपोरोल्लेखित ' विकृत मानसिकता ' बदलण्यास बराच काळ जावा लागणार आहे. मात्र शासन-प्रशासनाच्या पुढ...