58. विकासाच्या वाटेवरील भारत!
COVID-19 च्या लसीकरणामुळे तरुणांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढलेेय का? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. कोविड-19 ची लागण असलेल्या 18 ते 45 वयोगटातील निरोगी तरुणांचा आकस्मिकपणे 'हृदयविकाराच्या झटक्याने ' मृत्यू होत आहे. होणारे मृत्यू कोविड-19 च्या लसीमुळे होत आहे की नाही, हे तपासणारा अभ्यास " भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद " (The Indian Council of Medical Research) ने केलाय. संशोधनानुसार - झालेले आकस्मिक मृत्यू कोविड-19 च्या लसीमुळे झालेले नाहीत. याउलट लसीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होते. हे ठळकपणे ICMR ने नोंदवले आहे. कोविडची तीव्र (Severe) लागण, धूम्रपान, मद्यपान (Binge Drinking), अतिव्यायाम/शारीरिक श्रम (Intense Physical Activity) या कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे ICMR ने नमूद केले आहे. दक्षतेबाबत - ज्यांना पूर्वी गंभीर कोविड संसर्ग झालाय त्यांनी एक ते दोन वर्षे जास्त शारीरिक श्रमासह कोणतेही काम करू नये. हा केंद्रीय आरोग्य मंत्रीने दिलेला सल्ला लक्षात घेऊन धूम्रपान, मद्यपान, अतिव्यायाम आपण टाळायला हवा..! ~ सचिन विलास बोर्डे 14/1 The Indian Council of Medical Resea...