Posts

Showing posts with the label Freedom

174. विकासाच्या वाटेवरील भारत!

उद्या भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला 76 वर्षे पूर्ण होतील. या शहात्तर वर्षाच्या कार्यकाळात राज्यघटनेने देशाच्या अन् देशातील नागरिकांच्या विकासाला आधार पुरविला. या अनुषंगाने " राज्यघटनेच्या संरचनेचा " हा थोडक्यात आढावा... सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या तत्वांतून भारतीय संविधानाची ' तात्विक चौकट ' निर्माण झाली. समता, समानता, बंधुता, न्याय यांच्या ' तात्विक भिंती ' उभ्या केल्या गेल्या. अन् त्यावर स्वातंत्र्यचं ' तात्विक छत ' उभारल गेलं. आजूबाजूला कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ आणि न्यायमंडळांच ' तात्विक कुंपण ' बांधलं गेलं. या कुंपणात नागरिकांसाठी न्यायाची, विचार-अभिव्यक्तीची, श्रध्दा-उपासनेची, समतेची, बंधुतेची ' तात्विक वृक्षे ' रोवली गेली. अन् या सर्वांतून ' संविधानरूपी एक सुंदर बंगला ' तयार झाला. 26 जानेवारी 1950 ला देशातील नागरिकांनी याच संविधानरूपी सुंदर बंगल्यात प्रवेश केला. शहात्तर वर्षांपासून आपण या बंगल्यात वास्तव्यास आहोत. घटनादुरुस्तीच्या रूपाने या बंगल्याची आपण वेळोवेळी डागडुजी करत आलोय. सोबतच या बं...

102. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने स्त्रियांच्या स्वातंत्र्याला निर्बंध घालणारे काही कायदे केलेत. या " नैतिक कायद्यातील (Morality Law) " नियमांनुसार अफगाणी महिलांना सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने बोलता येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यासह संपूर्ण शरीर झाकावे लागेल, मोठ्याने वाचण्यास अथवा गाणी म्हणण्यास मनाई, पुरुष नातेवाईक सोबत असल्याशिवाय स्त्रियांना एकटे घराच्या बाहेर पडण्यास तसेच नातेवाईक पुरुष सदस्य वगळता इतर पुरुषांना चेहरा दाखविण्यास बंदी घालण्यात आली आहे. सदाचाराचा/नैतिकतेचा प्रसार करण्याकरिता हे कायदे लागू केल्याचा मुलामा तालिबानी सरकार देत असले तरी हे कायदे स्त्री विरोधीच ठरतात. या कायद्यामुळे तिथल्या प्रशासनाच्या अधिकरांत प्रंचड वाढ होईल. तसेच पुरुषी वर्चस्व देखील वाढेल. परिणामी तिथल्या स्त्रियांवर शासन-प्रशासनाचं आणि समाजातील पुरुषाचं असं ' दुहेरी वर्चस्व तथा दुहेरी दमन ' असेल. या कायद्याने स्त्रियांचा सार्वजनिक मुक्त अवकाशावर निर्बंध घातल्याने स्त्रिया शारीरिक, मानसिक आणि वैचारिकरित्या बंदिस्त होतील. आणि बंदिस्त असलेल्या स्त्रिया स्वतःचा विकास साध्य करण...