Posts

Showing posts with the label AI

178. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकत्याच पार पडलेल्या ' एआय इम्पॅक्ट समिट ' मध्ये " गलगोटिया विद्यापीठाने " जागतिक पातळीवर भारताचे हसे उडवल्याने या प्रकरणाची चिकित्सा करणे क्रमप्राप्त ठरते. देशाच्या राजधानीत 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या या एआय समिटमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध नामवंत कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. शंभरहून अधिक देशांच्या प्रतिनिधींनी या समिटमध्ये हजेरी लावली. अन् या सर्वांत देशातल्या गलगोटिया नामक विद्यापीठाने ' दुसऱ्याच्या तंत्रज्ञानावर आपला हक्क ' सांगून फसवेगिरी केली. एआय समिटमध्ये प्रदर्शनास ठेवलेला ' रोबोटिक डॉग ' आम्ही तयार केल्याचा दावा या विद्यापीठाने केला. मात्र या रोबोटिक डॉगची निर्मिती अन् विक्री चीनद्वारे केली जाते. विद्यापीठाचा खोटा दावा समोर येताच चीन समवेत इतर देशांनी भारताची हसऱ्या भाषेत निंदा केली. केंद्र शासनाच्या विविध विभागांकडून 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या तीन वर्षांत 1 कोटी 67 लाख 44 हजार 900 रुपयांचा निधी या गलगोटिया विद्यापीठाला संशोधनासाठी देण्यात आल्याचा खुलासा याच विद्यापीठाच्या कागदपत्रांतून समोर आलाय. सोबतच ...

59. विकासाच्या वाटेवरील भारत!

शाळेत शिकलेला 'अश्मयुगीन मानव' आपणास आठवत असेल. जो कंद-मुळे खायचा, दगडाची हत्यारे/साधने वापरायचा. अगदी साधे जीवन जगायचा. हळूहळू त्याच्या बुद्धीत विचारांनी जन्म घेतला. मानवी विवेकाच्या कक्षा रुंदावल्या अन् तंत्रज्ञानाच्या विकासाने गती पकडली. आज या मानवाचे स्वरूप बदललेय. 'हा डिजिटल मानव डिजिटल युगात जगायला लागला.' ऑक्सिजन इतकं महत्व इंटरनेटला मिळालं. काळानुरूप हे तंत्रज्ञान (Technology) अधिकच विकसित होत आहे. यातीलच एक विकसनशील प्रकार म्हणजेच " Artificial Intelligence (AI) ." थोडक्यात मानवाने निर्माण केलेला हा 'यांत्रिक मेंदूच'..! Robotics, Marketing, Gaming, Education, Health Care, National Security, Cyber Security ई. क्षेत्रात AI ने अनेक उल्लेखनीय कामे पार पाडली आहेत. नैतिकतेचा अभाव, बेरोजगारीत वाढ, पक्षपात (Bias) या AI तील त्रुटीही तितक्याच खऱ्या. AI चा तथा Deepfake चा उपयोग करून फोटो किंवा व्हिडिओ चे Morphing अथवा Editing केल्या जाते. थोडक्यात, महिलांच्या फोटो तथा व्हिडिओला या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्हर्च्युअली विवस्त्र केल्या जातं. प्रसिद्ध...