95. विकासाच्या वाटेवरील भारत!

'विज्ञान आणि तंत्रज्ञान' या दोन घटकांमुळेच मानवाने आत्तापर्यंतची प्रगती साध्य केलीय. यातील "आधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology)" हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

इतिहासकाळात मानवाने त्याच्या सोईसाठी दगडी हत्यारांच तंत्र विकसित केलं. काळानुरूप हे तंत्र विकसित होत गेलं अन् या तंत्रज्ञानाने विविध रूपे घ्यायला सुरुवात केली.
आत्ताच्या आधुनिक युगात हे तंत्रज्ञान संगणक, मोबाईलशी संबंधित विविध रूपात बघायला मिळतय. ही आधुनिक साधने/तंत्रे 'सॉफ्टवेअर' च्या मदतीने चालतात.

जागतिकीकरणामुळे हे आधुनिक तंत्रज्ञान सार्वत्रिक होण्यास मदत झाली. विकसनशील देशांच्या तुलनेत विकसित देशांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासावर अधिकचा भर दिला. विकसित केलेलं हे तंत्रज्ञान सर्वच देशांत उपलब्ध केलं गेलं. विकसनशील देशांना हे तंत्रज्ञान परवडणार असल्याने त्याचा वापर वाढला.

विविध देशांनी त्यांचा राजकीय, आर्थिक, राजनयिक, शैक्षणिक कारभार या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पार पाडण्यास सुरुवात केली. यातून विकसनशील देशांच विकसित देशांवरील "तांत्रिक अवलंबित्व (Technological Dependence)" वाढीस लागलं.

हेच तांत्रिक अवलंबित्व 'मायक्रोसॉफ्ट विंडोज' मधील सॉफ्टवेअर अपडेट मुळे 'निळ्या स्क्रीन' च्या रूपानं दोन दिवसांपूर्वी समोर आलं. या तांत्रिक दोषामुळे भारत आणि इतर देशांच्या विमानसेवा, आरोग्यसेवा, बँकिंग व्यवस्था, भांडवली बाजार तसेच या तंत्रज्ञानाशी संलग्नित इतर सेवा विस्कळित झाल्या. कामकाज ठप्प झाले. सर्वत्र गोंधळ उडाला.

काही वेळाने हा तांत्रिक दोष दूर केला गेला असला तरी यातून तांत्रिक अवलंबित्व मात्र कमी झालेलं नाही. ही बाब भारताने लक्षात घ्यायला हवी. देशांतर्गत तंत्रज्ञान विकसित करण्यावर भारताने लक्ष पुरवायला हवे.

येणारे संभाव्य 'तांत्रिक धोके' टाळण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानातही भारताने 'आत्मनिर्भर' व्हायला हवं..!


~ सचिन विलास बोर्डे

22/3

Modern Technology | Globalization | Microsoft Windows | Crowdstrike | Microsoft Outage | Technological Dependence | Aatmanirbhar Bharat

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!