Posts

158. विकासाच्या वाटेवरील भारत!

नमस्कार वाचकांनो..! "जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।" यातूनच प्रेरणा घेत तीन वर्षांपूर्वी म्हणजेच दिनांक ' 02 OCTOBER 2022 ' रोजी " विकासाच्या वाटेवरील भारत! " या संकल्पनेचा प्रारंभ केला होता. आज या संकल्पनेला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या लेखमालेतून संवैधानिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रासंबधित शेकडो विषयांवर मी तार्किक, चिकित्सक अन् विश्लेषणात्मक लेखन सादर करीत आलोय. आपणही चार ते पाच मिनिटे वेळ वाचनासाठी देताय ही बाब देखील मला प्रेरणा देणारी ठरतेय. 'प्रकाशित केलेले लेख कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूने झुकलेले अथवा राजकारण करू पाहणारे मुळीच नाही. शासनाचे अनेक ध्येय-धोरणे उल्लेखनीय असतात तर काही धोरणे गफलतीची असू शकतात. तीच बाब समाजाला देखील लागू होते. समाजातही अनेक योग्य-अयोग्य बाबींचे मिश्रण असते. योग्य बाबींना/धोरणांना संमती देणे आणि अयोग्य बाबींवर/धोरणांवर टीका करणे, हीच भूमिका मी घेतलीय.' प्रकाशित लेखांबद्दल - या तीन वर्षांच्या काळात सातत्याने प्रत्य...

157. विकासाच्या वाटेवरील भारत!

लडाखमध्ये होणाऱ्या उपोषण आणि मागण्यांविषयी 07 एप्रिल 2024 ला मी ' लेख क्र. 19/1 ' प्रकाशित केला होता. त्या लेखात ' सोनम वांगचुक ' आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागण्या आपण लक्षात घेतल्या होत्या. अन् त्या मागण्या योग्य असल्यास शासनाने त्यावर निर्णय घ्यावा हेही मी नमूद केले होते. त्या मागण्या अपूर्ण राहिल्याने हे आंदोलन पुन्हा उभे केले गेले. मात्र या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने आंदोलनाच्या अग्रभागी असलेल्या सोनम वांगचुक यांना दोन दिवसांपूर्वी अटक केली गेली. अन् लडाख पुन्हा चर्चेत आला. ' राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली ' झालेल्या अटकेनंतर सोशल मीडियावर सोनम वांगचुक यांच्याविषयक अनेक आरोप-प्रत्यारोप लावले जाताहेत. लडाखच्या मागण्यांचा मुख्य मुद्दा मागे पडून सोनम वांगचुक हे देशविरोधी असल्याचं चित्र रंगवलं जातय. 'आंदोलनकर्त्यांनी लडाख भारतातून वेगळा करण्याची मागणी केलेली नाही.' ही अतिमहत्वाची बाब आपण लक्षात घ्यायला हवी. जमिनीच्या, संस्कृतीच्या, भाषेच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी लडाखला ' सहाव्या परिशिष्टात ' समाविष्ट करावे, लडाखला ' स्वतंत्र राज्या...

156. विकासाच्या वाटेवरील भारत!

16 सप्टेंबर हा दिवस ' जागतिक ओझोन दिन (World Ozone Day) ' या अर्थाने लक्षात ठेवला जातो. यानुषंगाने पृथ्वीच्या अस्तित्वासाठी " ओझोनचं महत्व " आजच्या लेखातून समजून घेऊया. ओझोनचा अर्थ अन् महत्व - ऑक्सिजनचे तीन अणू मिळून ओझोनचा एक रेणू तयार करतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 15 ते 50 किलोमीटर वर आढळणाऱ्या स्थितांबर (Stratosphere) या थरात पृथ्वीच्या अवतीभोवती ओझोनचे आवरण आढळते. त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू, अंधत्व तसेच पिकांना आणि सागरी जीवसृष्टीला नुकसानकारक असणारे ' Ultraviolet (UV), UV-B ' ही किरणे ओझोनोमुळे शोषली जातात. थोडक्यात, हानिकारक अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण ओझोनच्या थरामुळे शक्य होते. ओझोनचा ऱ्हास - मानवी प्रगतीसाठी पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचे मनसोक्त शोषण करण्याचा गुणधर्म मानवाने आजपर्यंत जपलेला आहे. याच गुणधर्मातून Chlorofluorocarbons (CFCs), Halons, Carbon Tetrachloride, Methyl Chloroform, Methyl Bromide, Hydrobromofluorocarbons (HBFCs) इत्यादी मानवनिर्मित रसायनांच्या साह्याने मानवाने यंत्रे-तंत्रे अन् विविध वस्तू बनविल्या. आता हीच ...

155. विकासाच्या वाटेवरील भारत!

10 ते 19 या वयोगटाला " किशोरावस्था (Adolescence) " समजले जाते. किशोरावस्थेच्या या टप्प्यात मुलामुलींत अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक बदल घडतात. या तारुण्याच्या काळात शरीरात विविध हार्मोन्स निर्माण होतात. बुद्धीचा झटपट विकास सुरू होतो. मात्र ' पुरेशी समज ' अजूनही या वयात निर्माण होत नाही. या तारुण्याच्या अवस्थेत मुलंमुली नवनवीन गोष्टी जाणून घेण्यास ' अतिउत्साही ' असतात. 13 ते 19 या वयोगटात हे प्रमाण अधिक असते. याच वयात या लेकरांना त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक बदलांविषयी योग्य मार्गदर्शन मिळणं महत्वाचं असत. हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात बहुसंख्य कुटुंबांकडे एकतरी ' स्मार्टफोन ' बघायला मिळतो. अन् आता शिक्षणही डिजिटल झालंय. परिणामी या 13 ते 19 वयोगटातील लेकरांकडे ' शिक्षणाच्या हेतूने ' स्मार्टफोन्स दिले जातात. मात्र अलीकडच्या काही काळात ही लेकरं शिक्षणाचा हेतू बाजूला सारून इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या ' आभासी दुनियेतच ' मग्न होताना दिसताय. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही लेकरं योग्य मार्गदर्शनाच्या अभावाने अ...