145. विकासाच्या वाटेवरील भारत!
संतांची भूमी या नावे महाराष्ट्र ओळखला जातो. महाराष्ट्राच्या भूमीवर या संतांनी ' कीर्तनातून अन् अभंगांची ' रचना करून समाज सुधारणेचं अन् समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेतलं. हीच बाब पुढील दोन अभंगातून समजून घेऊया... अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांवर प्रहार करत तेराव्या शतकातील " संत नामदेव " लिहितात, पोटीं अहंतेसी ठाव । जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव ॥१॥ भजन चालिलें उफराटें । कोण जाणे खरें खोटें ॥२॥ सजि-वासी हाणी लाथा । निर्जिवपायीं ठेवी माथा ॥३॥ सजीव तुळसी तोडा । पूजा निर्जिव दगडा ॥४॥ वेला करी तोडातोडी । शिवा लाखोली रोकडी ॥५॥ तोंड धरून मेंढा मारा । म्हणति सोमयाग करा ॥६॥ सिंदूर माखूनियां धोंडा । त्यासि भजती पोरेंरांडा ॥७॥ अग्निहोत्राचा सुकळ । कुश पिंपळाचा काळ ॥८। एत्तिकेची पूजा नाना । जित्या नागा घेती डांगा ॥९॥ नामा ह्मणे अवघें खोटें । एक हरिनाम गोमटें ॥१०॥ या अभंगातून नामदेव ' दगडाच्या देवाला ' नाकारतात अन् या दगडी देवाच्या अवतीभवती असलेल्या ' अंधश्रद्धेची ' चिरफाड करतात. नामदेवांच्या अभंगामुळे तुम्ही दगडी देव नाकारला तर ' अस्सल देव ' शोधणार कुठं? या ...