Posts

Showing posts with the label Monsoon Season

152. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारतासाठी मान्सून दरम्यान पडणाऱ्या पावसाच्या सरी अत्यंत महत्वाच्या समजल्या जातात. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसाने जमीन पुरेशी भिजण्यास मदत होते. तद्नंतर ' शेतकरी ' आपल्या शेत-पेरणीला सुरुवात करतात. हीच " शेती व्यवस्था " समजण्याकरिता लेख क्र. 21/3 काही बदलांसह पुन्हा प्रकाशित करीत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके तसेच इतर साधनांची जुळवा-जुळव करण्यासाठी पुरेसा ' पैका ' (पैसा) आवश्यक असतो. सगळी साधनं अन् पाऊस मुबलक असला की शेती चांगली पिकते. शेतकऱ्यांस चांगले उत्पन्न होते. देशात ' मुबलक धान्यपुरवठा ' होतो परिणामी अन्न-धान्यांच्या किमती स्थिर राहतात. सर्वसामान्यांना या किमती परवडणाऱ्या असल्याने त्यांचा खान-पानावरील खर्च वाढून त्यांचे ' आरोग्य अन् जीवनस्तर ' उंचावतो. शेवटी हेच सक्षम ' अदृश्य हाथ ' अर्थव्यवस्थेस गती देऊन देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात.  देशातील शेतकऱ्यांकडे शेती पिकविण्यासाठी लागणाऱ्या ' किमान पैशाचा कायम तुटवडा ' असतो. यामुळे शेतकरी ' कर्जाच्या ' माध्यमातून पैसा उभा कर...