152. विकासाच्या वाटेवरील भारत!
भारतासाठी मान्सून दरम्यान पडणाऱ्या पावसाच्या सरी अत्यंत महत्वाच्या समजल्या जातात. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसाने जमीन पुरेशी भिजण्यास मदत होते. तद्नंतर ' शेतकरी ' आपल्या शेत-पेरणीला सुरुवात करतात. हीच " शेती व्यवस्था " समजण्याकरिता लेख क्र. 21/3 काही बदलांसह पुन्हा प्रकाशित करीत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके तसेच इतर साधनांची जुळवा-जुळव करण्यासाठी पुरेसा ' पैका ' (पैसा) आवश्यक असतो. सगळी साधनं अन् पाऊस मुबलक असला की शेती चांगली पिकते. शेतकऱ्यांस चांगले उत्पन्न होते. देशात ' मुबलक धान्यपुरवठा ' होतो परिणामी अन्न-धान्यांच्या किमती स्थिर राहतात. सर्वसामान्यांना या किमती परवडणाऱ्या असल्याने त्यांचा खान-पानावरील खर्च वाढून त्यांचे ' आरोग्य अन् जीवनस्तर ' उंचावतो. शेवटी हेच सक्षम ' अदृश्य हाथ ' अर्थव्यवस्थेस गती देऊन देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. देशातील शेतकऱ्यांकडे शेती पिकविण्यासाठी लागणाऱ्या ' किमान पैशाचा कायम तुटवडा ' असतो. यामुळे शेतकरी ' कर्जाच्या ' माध्यमातून पैसा उभा कर...