Posts

Showing posts with the label Doctors

104. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेखात आपण अभियांत्रिकी शाखेविषयी माहिती घेतली. या लेखात आपण वैद्यकीय शिक्षणाविषयक स्थितीचा आढावा घेऊ. इतर क्षेत्रांच्या तुलनेत " वैद्यकीय शिक्षण (Medical Education) " कडे विद्यार्थ्यांचा कल अत्यंत कमी. यांस कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारा ' पैसा '. अनेकांची खाजगी महाविद्यायात लाखो रुपये खर्च करण्याची ऐपत नसल्याने विद्यार्थी या क्षेत्रात येण्याचे टाळतात. सरकारी वैद्यकीय महाविद्यायात तुलनेने खर्च कमी असतो, मात्र इथे असणाऱ्या स्पर्धेत काहीजणच यशस्वी होतात. डॉक्टर होण्याच्या या प्रवासात विद्यार्थ्यांची मोठी रक्कम खर्च होते. हीच रक्कम परत मिळविण्याकरिता अन् धनसंपन्न होण्याकरिता ही नव-शिक्षित मंडळी प्रामुख्याने शहरांमध्ये आपले इस्पितळे उघडतात. यामुळेच मोठ-मोठ्या शहरांत मोठ-मोठी फी/Fee असलेल्या मोठ-मोठ्या दवाखान्याच्या इमारती बघायला मिळतात. तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल तर तुम्ही या मोठ-मोठ्या इस्पितळात तुमच्या दुखण्याचा इलाज करू शकता, अन् तुमच्याकडे पैसाच नसेल तर ' सरकारी डॉक्टर्स ' अन् ' सरकारी इस्पितळे...

75. विकासाच्या वाटेवरील भारत!

दोन-चार दिवसांपूर्वी मनाला खिन्न, निराश, हताश, चिंतित करणारे वृत्त वाचनात आले. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बर्डीपाड्याची रहिवासी ' कविता राऊत ' नामक गर्भवती मातेविषयीचे हे वृत्त. तारीख 15 फेब्रुवारी, वेळ रात्रीची. दिवस भरलेल्या या गर्भवती मातेला प्रसूतीवेणा/कळा सुरू झाल्या. उपचारासाठी तिला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली खरी, मात्र ती वाटेतच बंद पडली. अन् त्या बंद पडलेल्या रुग्णवाहिकेतच त्या मातेची प्रसूती झाली. मात्र तिची प्रकृती खालावली. काही वेळानंतर दुसऱ्या रुग्णवाहिकेने तिला ग्रामीण रुग्णालयात नेले. पण तिथे पुरेश्या सुविधा नसल्याने तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालय गाठण्यापूर्वीच या मातेने आपला जीव गमावला... दुर्गम भागातील ' सरकारी आरोग्य व्यवस्थेवर ' शासन-प्रशासनाच्या होणाऱ्या दुर्लक्षाचे हे फलित. आरोग्य अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, बंद पडणाऱ्या रुग्णवाहिका, ग्रामीण रुग्णालयात आवश्यक साधन-सुविधांचा अभा...