Posts

Showing posts with the label World Population

8. विकासाच्या वाटेवरील भारत!

गेल्या काही दिवसांपूर्वी पृथ्वीने 800 कोटी लोकसंख्येचा पल्ला गाठलाय... सार्वजनिक आरोग्य, पोषण, वैयक्तिक स्वच्छता आणि योग्य औषधोपचार याचे हे फलित. लोकसंख्येचा थेट परिणाम त्या देशाच्या विकासाच्या प्रत्येक कांगाव्याशी निगडित असतो. परिणामी जेवढी लोकसंख्या अधिक तेवढा संसाधनांवरचा भार अधिक... म्हणजेच संसाधनांचा शाश्वत उपयोग करणे महत्वाचे. भारताचा 800 कोटीतील वाटा - 2022 मध्ये भारताची लोकसंख्या अंदाजे 141.2 कोटी आहे. 2025 सालापर्यंत चीनला मागे टाकत भारताची लोकसंख्या 166.8 कोटी तर चीनची 131.7 कोटी होईल. असे असले तरी कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढल्यामुळे भारताचा लोकसंख्या वाढीचा दर स्थिरावत असल्याचा अंदाज ' संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीने ' वर्तवलाय. उत्तम शिक्षण / साक्षरता, कुटुंबनियोजनाचे गांभीर्य, संसाधनांचा योग्य वापर, पर्यावरण, पुढच्या पिढीचा विचार, तरुणांमध्ये कौशल्यांचा विकास, रोजगार निर्मिती, आरोग्य, उद्योग, तंत्रज्ञान इत्यादी मुद्द्यांवर व्यक्ती, समाज आणि शासनाने कटाक्षाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे. यातून एकंदरीतच राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेला कमालीची गती प्राप...