Posts

Showing posts with the label Knowledge Sharing

45. विकासाच्या वाटेवरील भारत!

"ज्ञान बाटने से बढ़ता हैं।" हे सूत्र अनेकदा आपल्या कानावर पडत असते. पण हे ज्ञान वाटायला कुणाला वेळ मिळेना... अन् हल्ली मोठ-मोठ्या शाळा, संस्था ज्ञान वाटण्यासाठी भली-मोठ्ठी रक्कम घ्यायला लागल्या. आपल्याकडे फक्त नोकरीसाठी शिक्षण देण्यात येते आणि घेण्यात येते. घेतलेलं शिक्षण/ज्ञान आपण इतरांपर्यंत पोहोचवत नाही. नोकरी लागली की त्या शिक्षणाला आपण स्थगिती देतो. 'खरेतर शिक्षण केवळ पद-पैसा-प्रतिष्ठा मिळविण्याकरिता नसून, घेतलेलं शिक्षण हे समाजकार्यासाठी, समाजकल्याणासाठी असावे.' कारण प्रत्येक नागरिक आपल्या समूहाचे प्रतिनिधित्व करीत असतो. परिणामी 'स्वार्थी शिक्षण' घेऊन त्याने केवळ आपला संसार सुखकर न करता समाजाचाही विचार करावा. माझी विवेकी तरुण वर्गाला विनंती असेल, तुम्ही साचवलेलं ज्ञान मर्यादित ठेऊ नका. व्यक्त व्हायला शिका, लिहायला शिका, स्वतःची वैचारिक पातळी वाढवा, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, संस्कृती, विज्ञान, पर्यावरण ई. क्षेत्रांमध्ये निर्भीडपणे आपले मत मांडा, प्रत्येक मुद्द्याची तार्किक तपासणी करा. सोशल मीडियाची अनेक व्यासपीठे (Platforms) तुमच्यास...