20. विकासाच्या वाटेवरील भारत!
'भारतीयांनो आपल्या हक्क-कर्तव्याची तुम्हालाही जान असू द्या...!' असा उद्घोष थेट मनातून लेखनामध्ये साकारत आहे. संविधानापासून दुरावणाऱ्या समाजाला संविधानाची, हक्क-कर्तव्यांची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न. संविधानाच्या 'भाग तीन' मध्ये काही मूलभूत हक्क अंतर्भूत करण्यात आले आहेत. ज्याबद्दल आपण 'ऐकून' आहात... 'सोशल मीडिया चा वेळ आम्ही वाचनात का व्यतीत करावा..?' ही आपली भूमिका. असो.. विश्लेषणाकडे लक्ष केंद्रित करूया... संविधान नागरिकांना समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धर्म स्वातंत्र्याचा, संस्कृती जपण्याचा, शिक्षणाचा इत्यादी व्यापक हक्क-अधिकार बहाल करते. त्यासंबंधी सखोल विश्लेषण कलमांद्वारे समजून घेणे महत्वाचे ठरते. जसे, ' कलम 14 राज्याची भूमिका स्पष्ट करताना दिसते. राज्याने भारताच्या राज्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस कायद्यापुढे समान वागणूक द्यावी तथा कायद्याचे समान संरक्षण देखील करावे.' यातून समानतेच्या हक्कांची सुरुवात होते. या अनुच्छेदांची योग्य अंमबजावणी होतेय का?, आपणांस कायद्यापुढे समान वागणूक मिळतेय का?, कायद्याच...