Posts

Showing posts with the label Alcohol

148. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 34/3 मध्ये आपण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांचा थोडक्यात आढावा घेतला होता. आजच्या लेखातून " दारू अथवा मद्यपानाच्या " सेवनाने होणारे दुष्परिणाम जाणून घेऊया... भारताची स्थिती - केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या 2019-21 या वर्षाच्या "राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey- NFHS -5)" नुसार, देशातील 22% पुरुषांना आणि 1% स्त्रीयांना दारूचे व्यसन असल्याचे दिसते. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, तेलंगणा या राज्यांत दारूचे व्यसन असणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे अहवाल दर्शवित असला तरी, दारू पिणाऱ्यांची संख्या इतरही राज्यात आहेच. स्त्रियांच्या वैवाहिक जीवनात होणाऱ्या शारीरिक आणि लैंगिक छळांच्या प्रकरणांत 71% प्रकरणांमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या छळास ' मद्यपान करणारा पती ' जबाबदार असल्याचेही अहवाल अधोरेखित करतो. मद्यपानाचे/दारूचे/अल्कोहोलचे दुष्परिणाम - दारूच्या व्यसनाने यकृताचे आजार, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित रोग, कर्करोग, पचनसंस्थेविषयक समस्या, मेंदू आणि मज्जासंस्थेविषयक समस्या, ताण-तणाव, इत्या...